गोपनीयता धोरण

          एक सर्वसाधारण नियम म्हणून हे पोर्टल, ज्यायोगे तुम्हाला व्यक्तीश: ओळखणे आम्हाला शक्य होते अशी (नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा इ-मेल पत्ता यांसारखी) कोणतीही विशिष्ट वैयक्तिक माहिती तुमच्याकडून आपोआप हस्तगत करत नाही.

 

           हे पोर्टल, आपल्या भेटींची नोंद, पत्ते, डोमेन नाव, ब्राउझरचा प्रकार, कार्यचालन यंत्रणा (ऑपरेटिंग सिस्टिम ), भेटीची तारीख व वेळ आणि पाहिलेली पृष्ठे यांसाखी माहिती हस्तगत करत नाही. संकेतस्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीशी या पत्त्याचा दुवा जोडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करत नाही.  तसेच आम्ही, वापरकर्ते अथवा त्यांच्या ब्राउझर विषयक कृतींचा शोध घेणार नाही.